इसिसने रचला खतरनाक प्लॅन, जगासमोर गंभीर धोका !

16

सामना ऑनलाईन। लंडन

पश्चिम आशियातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या इसिसने आपला मोर्चा आफ्रिकेकडे वळवला आहे. आफ्रिकेत सक्रीय असलेल्या बोको हराम व अल कायद्यासारख्या दहशतवादी संघटनांशी इसिसने हातमिळवणी केली आहे. या संघटनांच्या मदतीने आफ्रिकेत अराजकता माजवायची व येथील माणसांचे जत्थे युरोपमध्ये घुसवून तेथे मोठा नरसंहार घडवून आणायचा हेच इसिसचे लक्ष्य आहे. असा गौप्यस्फोट संयुक्त राष्ट्राच्या विश्व खाद्य कार्यक्रमाचे प्रमुख व साऊथ कैरॉलिनचे माजी रिपब्लिकन गव्हर्नर डेविड बेस्ली यांनी केला आहे.

तसेच इसिसच्या अत्याचारामुळे आफ्रिकेतून युरोपमध्ये पळणाऱ्या नागरिकांची संख्या ही सीरियातून पळालेल्या नागरिकांच्या तुलनेत नक्कीच जास्त असेल व त्याचे परिणाम महाभयंकर असतील असेही बेस्ली यांनी म्हटले आहे. सीरियावर आयोजित कार्यक्रमात बोलत असताना बेस्ली यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

आफ्रिकेत सध्या अन्नधान्याचा तुटवडा आहे. याचाच गैरफायदा घेत येथील नागरिकांना देश सोडून युरोपमध्ये पळवण्याचा घाट इसिसने आखला आहे. आफ्रिकेतील साहेल क्षेत्रामध्ये सेनेगल,दक्षिणी मारिटानिया,सेंट्रल माली,बुर्किनो फासो, अल्जिरियाचा दक्षिण भाग, व नायजेरियाचा उत्तरेकडील भागांचा समावेश आहे. या भागांव्यतिरिक्त मध्य चाड , मध्य व दक्षिण सूदान, इथियोपिया या क्षेत्रांवरही इसिसने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या