ISIS मध्ये येऊ नका, दहशतवादी महिलेचे कळवळीचे आवाहन

1694

आयेशा उर्फ सोनिया सबासिस्टियन ही महिला आयसिसमध्ये सामील झाली होती. परंतु कोणीही इसिसमध्ये सामील होऊ नका अशी कळकळीचे आवाहन ती सध्या करत आहे. आयसिसमध्ये सामील होऊन आपला खूप अपेक्षाभंग झाला असे आयेशाने सांगितले.

आयेशा मूळची केरळची असून तिच्यासोबत फातिमा उर्फ निमिशा ही सुद्धा आयसिसमध्ये सामील झाली होती. आता दोघींना आपल्या मायदेशी परतायचे आहे. आयेशा सध्या अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये तुरुंगात कैद आहे. जेव्हा आपण आयसिस मध्ये सामील झालो तेव्हा आपल्या खूप अपेक्षा होत्या. परंतु या अपेक्षा भंग पावल्या असून यापुढे कुणीही आयसिसमध्ये सामील होण्यापूर्वी दोन वेळा विचार करा असे तिने म्हटले आहे. तसेच अपाल्याला मायदेशी परतायचे आहे असेही तिने सांगितले.

खिलाफत चळवळीसाठी आपण आयसीसमध्ये सामील झालो. आणि त्यासाठीच आपण अफगाणिस्तानमध्ये गेल्याचे तिने सांगितले. परंतु इथले लोक नमाज पढण्यासाठी मशीदीतही जात नाही त्यामुळे आता यापुढे आयसिससाठी काम नाही करायचे असे आयशाने ठरवले. आयेशाचा पती रशीदही आयसिससाठी काम करत होता. रशीदलाही या कामाचा कंटाळा आला होता असे त्याने मृत्यूपूर्वी म्हटले होते.

आयेशाला आता मायदेशी परत यायचे आहे. परंतु आयेशा एकटी नाहिये. फातिमा उर्फ निमिषाही ही सुध्दा आयसिसमध्ये सामील झाली होती.  तिलाही हिंदुस्थानात परतायचे आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या