इस्रायल मास्कमुक्त! शाळा, कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर बनली असताना इस्रायलने मात्र इतिहास घडवला आहे. इस्रायल मास्कमुक्त झाला आहे. इस्रायलने सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असे जाहीर केले आहे. नियोजनबद्धरीत्या राबवलेल्या लसीकरण कार्यक्रमामुळे कोरोनावर मात केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलने आपल्या देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली. नियोजित कालावधीत आपल्या प्रत्येक नागरिकाला इस्रायलने लस दिली. त्या जोरावर इस्रायलने कोरोनावर नियंत्रण मिळवले. आता इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालताही नागरिकांना वावरता येणार आहे.

इस्रायलमध्ये गेल्या वर्षी 8 लाख 36 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 6 हजार 331 जणांचा मृत्यू झाला होता. शाळा, महाविद्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास इस्रायल सरकारने परवानगी दिली आहे. इस्रायल मास्कमुक्त झाला असला तरी बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होणाऱया कार्यक्रमांमध्ये मात्र मास्कची सक्ती कायम ठेवण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांचेही लसीकरण येत्या मे महिन्यापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या