Video – हिंदुस्थानच्या मदतीसाठी इस्राएलच्या नागरिकांचं शिव शंकराला साकडं, ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्राचा जप

israeil-citizen-chant-om-namah-shivay

हिंदुस्थान कोरोनाची दुसरी लाट भयंकर ठरत आहे. काही दिवसांपासून जवळपास 3 ते 4 लाख रुग्ण देशात आढळत आहेत. आरोग्य व्यवस्थेची अवस्था बिकट आहे. अशा स्थितीत देखील हिंदुस्थान हार न मानता लढत आहे. हिंदुस्थान या संकटातून बाहेर यावा यासाठी परदेशातून मदतीचा हात पुढे येत आहे. ऑक्सिजन, औषधांसाठी अन्य देशांनी आपले हात पुढे केले आहेत. त्यासोबतच अन्य देशात हिंदुस्थानसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

इस्राएलच्या नागरिकांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. इस्राएलमधील नागरिकांनी एकत्र येऊन ‘ऊँ नम: शिवाय’ या मंत्राचा जप केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. भगवान शंकर हे दु:ख, दैन्य, ताप, पाप हरण करणारे मानले जातात. त्यांच्या नाम जपातून हिंदुस्थानला शक्ती मिळो अशा उद्देशाने हा जप सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


View this post on Instagram

A post shared by Pawan K Pal (@pawank90)

हा व्हिडीओ पवन के पाल यांनी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केले आहे. ते इस्राएलमध्ये हिंदुस्तानचे राजकीय दूत आहेत. 2017 मध्ये ते पासआउट झाले. ‘आपल्यासाठी संपूर्ण इस्राएल एकत्र येऊन आशेचा किरण बनत आहे’, असे त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


View this post on Instagram

A post shared by Pawan K Pal (@pawank90)

इस्राएल आणि हिंदुस्थानमध्ये चांगली मैत्री आहे. अध्यात्मिकतेचा संदेश घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी असंख्य इस्राएली नागरिक हिंदुस्थानला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. काही जण सांगतात की इस्राएलमध्ये तीन वर्ष लष्कराचे अत्यंत कठीण ट्रेनिंग घेतल्यानंतर बरेच जण मन:शांतीसाठी येथे येतात. हिमाचल प्रदेश, लडाखमधील पर्वत रांगांमध्ये साधना करतात.

काही दिवसांपूर्वीच इस्राएल कोरोनामुक्त देश जाहीर करण्यात आला. लसीकरण आणि शिस्त या जोरावर इथल्या नागरिकांनी कोरोनावर मात केली. आता इस्राएलमध्ये कोणत्याही प्रकारचे बंधने नाहीत. इस्राएलमध्ये मुक्तसंचार करण्यास परवानगी आहे. इस्राएलच्या कोरोना मुक्तीनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. योग्य पावलं उचलत कोरोनामुक्त होणाऱ्या देशांची संख्या येत्या काळात लवकरच वाढेल असेही सांगण्यात येत आहे. मात्र त्यासाठी, शिस्त आणि लसीकरण हेच प्रभावी माध्यम असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या