संरक्षण क्षेत्रात इस्रायलचे पाऊल पुढे, लेझर गनने पाडले ड्रोन विमान

अत्याधुनिक शस्त्रांसाठी चर्चेत असणाऱ्या इस्रायलच्या लष्कराने संरक्षण क्षेत्रात आणखी एक आश्वासक पाऊल टाकले आहे. इस्रायलने एअरबॉर्न लेझर गनच्या मदतीने ड्रोन विमान पाडण्यात यश मिळवले. इस्रायलच्या लष्कराने नुकतीच याची चाचणी घेतली. हे यश मैलाचा दगड असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही लेझर गन हवेतून मारा करणारे ड्रोन, मोर्टार, रॉकेट, क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यास सक्षम आहे. भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन विमानांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर ही चाचणी महत्त्वाची समजली जात आहे. मागील वर्षी झालेल्या आर्मेनिया-अजरबैझान युद्धात इस्रायली आणि तुर्की ड्रोन विमानांनी जोरदार हल्ले करत आर्मेनियन सैन्याचे कंबरडे मोडले होते. या ड्रोन हल्ल्याविरोधात आर्मेनियाच्या तोफा आणि रणगाडे निप्रभ ठरले होते. या पार्श्वभूमीवर इस्रायलचा नवा लेझर गन आविष्कार प्रभावी मानला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या