Gaganyaan Mission – डिसेंबर 2020 मध्ये इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम

562

महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेबाबत इस्रो प्रमुख के. सिवन यांनी शनिवारी माहिती दिली. गगनयान मोहीम हिंदुस्थानसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या मोहिमेला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2020 पर्यंत मानव अंतराळ विमानाचे पहिले मानवरहित यान अंतराळात झेपावणार असल्याचे सिवन यांनी सांगितले.

जुलै 2021 पर्यंत दुसरे मानवरहित अंतराळयान बनवण्याचे उद्दीष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. तसेच डिसेंबर 2021 पर्यंत पहिल्या हिंदुस्थानी व्यक्तीला रॉकेटद्वारे अंतराळात नेण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता हे लक्ष्य नजरेसमोर ठेवत इस्रोकडून काम करण्यात येत आहे. हे लक्ष्य साध्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चांद्रयान – 2 ही इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम होती. विक्रम लँडरशी संपर्क झाला नसला तरी ऑर्बिटर उत्तमप्रकारे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या