इस्रोकडून NVS-1 NavIC चं यशस्वी उड्डाण; नेव्हिगेशन क्षमता वाढणार

NVS-1 NavIC satellite

 

हिंदुस्थानची अंतराळ संस्था ISRO ने आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV (Geosynchronous Satellite Launch Vehicle) द्वारे  NVS-1 NavIC नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. उड्डाणानंतर सुमारे 20 मिनिटांनंतर, रॉकेटने उपग्रहाला सुमारे 251 किमी उंचीवर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये स्थिर केले, असं इस्रोनं सांगितलं. नेव्हिगेशन उपग्रह निश्चित कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यात आला आहे.

इस्रोने 2023 मधील पाचवे प्रक्षेपण आयोजित केले असून 2232 किलोग्रॅमचा उपग्रह, त्याच्या NavIC मालिकेचा भाग, अवकाशात सोडला.

NVS-1 हा पुढच्या पिढीच्या NavIC उपग्रहाचा पहिला उपग्रह आहे ज्याचा उद्देश देशाच्या नेव्हिगेशन क्षमतांमध्ये वाढ करणे आहे. देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राची परिस्थिती, नेव्हिगेशन आणि वेळेसाठी वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

NavIC उपग्रहांचा वापर जमिनीवरील तसेच हवाई आणि सागरी वाहतूक, स्थान-आधारित सेवा, वैयक्तिक गतिशीलता, संसाधन निरीक्षण, सर्वेक्षण आणि भू-विज्ञान, वैज्ञानिक संशोधन, वेळ प्रसार आणि संक्रमण आणि सुरक्षितता-ऑफ-लाइफ अलर्ट साठी केला जातो. NavIC सिग्नल 20 मीटरपेक्षा अधिक अचूक आणि 50 नॅनोसेकंदांपेक्षा अधिक चांगल्या वेळेची अचूकता यूझर्सची स्थिती मिळवण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.

या यशस्वी उड्डाणानंतर ‘आमच्याकडे आता आणखी मोठे पेलोड्स लाँच करण्याची क्षमता आहे’, असं इस्रोनं म्हटलं आहे.