कामवालीवर बलात्कार करून व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकणारा अभियंता अटकेत

सामना ऑनलाईन, हैदराबाद

एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेल्या अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अभियंत्याने घरकाम करणारीवर बलात्कार करून तिचा व्हिडीओ पॉर्नसाईटवर अपलोड केला होता. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने हे उद्योग केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. नागेश्वर राव असं या अभियंत्याचे नाव असून तो २८ वर्षांचा आहे. ज्या पॉर्न साईटवर त्याने व्हिडीओ अपलोड केला आहे, त्या वेबसाईटवर व्हिडीओ शेअर करणाऱ्या महत्वाच्या लोकांमध्ये नागेश्वरला सामील व्हायचं होतं. महत्वाचा व्हिडीओ पुरवठादार झाल्यास वेबसाईटकडून आकर्षक रक्कम मिळणार होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पॉर्न साईटवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर कामवाल्या बाईच्या ओळखीच्या माणसानू तिला आणि तिच्या कुटुंबाला याची माहिती दिली. हादरलेल्या पिडीतेने तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि नागेश्वर राव विरोधात तक्रार नोंदवली. पिडीतेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नागेश्वर रावच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पॉर्नसाईटवरून हा व्हिडीओ डिलीट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.