परिस्थिती गंभीर! अखेर दिल्लीत 6 दिवसांचा कडक लॉकडाउन

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरता हाताबाहेर जाऊ लागलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीत अखेर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाउन 6 दिवसांकरिता लावण्यात आला असून आज म्हणजचे सोमवारी रात्री 10 वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सहा दिवसांच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

विनाकारण घराबाहेर पडण्यावर पूर्ण बंदी आणण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशी जोडलेल्या व्यक्तीच प्रवास करू शकतील. सर्व खासगी कंपन्यांना वर्कफ्रॉम होम देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कचेऱ्यांमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारीच उपस्थित असतील.

रुग्णालये, मेडिकल स्टोर, लसीकरण केंद्रात जाण्यासाठीच मूभा देण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टेशन याकरिता सूट देण्यात येईल.

मेट्रो, बस सेवा सुरू असतील मात्र त्यामध्ये 50 टक्क्यांनेच प्रवासी प्रवास करू शकतील. एटीएम, पेट्रोल पंप खुले असतील, मात्र विझिटर्सना परवानगी देण्यात येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या