डाएट संदर्भातले गैरसमज दूर करा

184

dr-namrata-bharambe>> डॉ. नम्रता नितीन महाजन-भारंबे

आजकाल अगदी सहज कानावर पडणारे शब्द म्हणजे ‘डाएट’. चार-पाच जणांच्या घोळक्यात एकजण तरी हमखास ‘डाएट’वर असतो कारण त्याला वजन कमी करायचे असते आणि मग त्यातीलच एखादी व्यक्ती बोलते; नाही रे! डाएट वगैरे केल्याने काही होत नाही. खरंच असं आहे का? डाएट म्हणजे काय? डाएट का करावं? डाएट कसं करावं? या शंकांचे थोडक्यात समाधान करण्याचा हा प्रयत्न.

बहुतांश लोक ब्रेक फास्ट न घेणे, रात्रीचे जेवण म्हणून फक्त सूप वा सॅलड खाणे किंवा फक्त प्रोटीन्स घेणे असे एक ना अनेक प्रकार करतात. पण हे योग्य नाही. मुळात डाएट म्हणजे उपाशी राहणे असे अजिबात नाही; तर डाएट म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शरीरानुसार आवश्यक अन्नपदार्थ योग्य प्रमाणात व ठराविक कालांतराने घेणे त्यामुळे तुमच्या शरीरातील कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे यांचे प्रमाण संतुलित राहील योग्य प्रकारे केलेल्या डाएटमुळे होणारे फायदे अशाप्रकारे आहेत:

> वजन नियंत्रित राहते

> सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते. पूर्ण दिवसभर कामाचा उत्साह राहतो

> योग्य वेळी भूक लागते

> रक्तातील साखर योग्य प्रकारे नियंत्रित व कार्यरत राहते

> जेवणानंतर किंवा इतर वेळी उगाच काही गोड खाण्याची इच्छा ज्याला आपण (Sweet Craving) म्हणतो ती संपुष्टात येते.

> व्यस्त जीवनशैलीमुळे व अनियमित खाण्यामुळे होणारे अॅसिडिटी (acidity), बद्धकोष्ठ ही लक्षणे दूर होतात

> हार्मोन्सचे संतुलन राखले जाते

> झोप शांत लागते

> शरीराचे जैविक घड्याळ योग्य प्रकारे कार्यरत राहते

> त्वचा, केस यांचे आरोग्य राखले जाते व (ageing process) वार्धक्य लांबणीवर टाकले जाते

आपल्याला वरील माहिती कशी वाटली जरूर कळवा. Email: [email protected]

फोन क्रमांक: ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या