मुझसे शादी करोगी? अधिवेशनादरम्यान भर संसदेत खासदाराने प्रेयसीला केले प्रपोज

संसद सत्रादरम्यान अनेक मजेशीर किस्से घडत असतात. अनेकदा खासदार मोबाईलमध्ये डोके घालून बसल्याचे दिसतात, तर काही खर्राटे घेत पडलेले असतात. आपल्याकडे असे अनेक किस्से घडल्याचे पाहिले आहे, मात्र विदेशातील संसदभवन मात्र आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच असल्याचे दिसते. इटलीमध्ये संसद सत्रादरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना एका खासदाराने चक्क प्रेयसीला प्रपोज केले.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीतील संसदेमध्ये अर्थमंत्री भूकंपावर भाषण देत असतानाच त्यांनी आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. यामुळे हास्याचे फवारे उडाले. विशेष, म्हणजे अर्थमंत्र्यांनी फक्त प्रपोजच केले नाही, तर ते आपल्यासोबत एक अंगठीही घेऊन आले होते. ती अंगठी दाखवून त्यांनी, ‘एलिसा, माझ्यासोबत लग्न करशील?’ असे म्हणत तिला मागणी घातली.

फ्लॅवियो डी मुरो (Flavio Di Muro) असे या 33 वर्षीय खासदाराचे नाव आहे. 2016 मध्ये इटलीत आलेल्या भूकंपाबाबत ते भाषण देत होते. ‘संसदेतील सर्वच सदस्य प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय कामामध्ये व्यस्त असतात. परंतु यामुळे जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपण विसरून जातो. एकप्रकारे आपण त्यांच्या प्रेमाचा अनादर करतो. परंतु आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. असे म्हणत त्यांनी टेबलाखालून एक अंगठी काढली आणि प्रेयसीला, एलिसा माझ्यासोबत लग्न करशील?’, असे म्हणत प्रपोज केले. यानंतर संसदेतील सर्वच सदस्यांनी त्यांची गळाभेट घेत अभिनंदनही केले.

दरम्यान, संसदेतील हा व्हिडीओ पाहिल्यनंतर फ्लॅवियो डी मुरो (Flavio Di Muro) यांना त्यांच्या प्रेयसीने ‘हो’, असे उत्तर दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या