विमान उडवण्याची ४ पिढ्यांची परंपरा असलेले भसीन कुटुंब

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उंच मोकळ्या निळ्याशार आकाशात ढगांच्या पुंजक्यांमधून विमान उडवणं यासारखा दुसरा थरारक अनुभव नाही. यामुळे अनेक लहान मुलांना मोठं झाल्यावर पायलट व्हायचं असतं. काहीजणांचं हे स्वप्न पूर्ण होतं. तर काहींचं स्वप्न हवेत विरुन जातं. पण मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. दिल्लीतील भसीन कुटुंबाने हे दाखवून दिलं आहे. पायलट होण्याचा ध्यास यांच्या रक्तातच असून १०० वर्षापासून हे अख्ख कुटुंबच विमान उडवत आहे. आता त्यांची चौथी पिढीही पायलट असून यात मुला-मुलींचाही समावेश आहे.

१९५४ साली जयदेव भसीन यांनी इंडियन एअरलाईन्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जयदेव त्या सात पायलटमधील एक पायलट होते जे पुढे जाऊन कमांडर झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा रोहितही पायलट झाला. रोहितचा विवाह पायलट असलेल्या निवेदिता जैनबरोबर (२६) झाला. निवेदिता जगातील सर्वात कमी वयाची जेट महिला कॅप्टन झाली. फक्त २० वर्षाची असताना निवेदिता इंडियन एअरलाईन्सची पायलट झाली. त्यानंतर ३३ व्या वर्षी ती ती जगातील सर्वात मोठे विमान ३०० ची कमांडर झाली. आपल्या आईवडिलांना विमान उडवताना बघून रोहित-निवेदिता यांचा मुलगा रोहन व मुलगी निहारिका यांच्यातही पायलट बनण्याचे स्वप्न आकार घेऊ लागले. आज रोहन बोईंग-७७७ चा कमांडर आहे तर निहारिका इंडिगोत पायलट आहे. तिला आपला जोडीदार पायलटच हवा आहे. रोहनने आपले वडिल रोहित यांच्याबरोबर १० हून अधिक वेळा विमान उडवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या