वेळ आलीय ‘त्यांना’ भारतरत्न देण्याची!: लष्करप्रमुख

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा यांना देण्याची मागणी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७नंतर हिंदुस्तानी लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून के. एम. करियप्पा यांनी सूत्रं हातात घेतली होती.

फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा यांना ‘भारतरत्न’ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. भारतरत्न पुरस्काराचा सन्मान मिळण्यास अनेक जण पात्र झाले आहेत आणि करियप्पा यांना हा पुरस्कार मिळण्यास कोणतीही अडचण दिसत नाही, असेही रावत म्हणाले.

के. एम. करियप्पा यांचा जन्म १८९९मध्ये झाला होता. करियप्पा यांनी दुसऱ्या महायुद्धात आणि १९४७मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात लष्कराचे नेतृत्व केले होते. त्यानंतर १९८६मध्ये सॅम माणेक शॉ यांच्यानंतर जनरल के. एम. करियप्पा यांना फिल्ड मार्शल पद दिले गेले होते. माणेक शॉ यांच्यापेक्षा वरिष्ठ असतानाही करियप्पा यांना उशिराने फिल्ड मार्शल हे पद देण्यात आले होते. फिल्ड मार्शल पद मिळाल्यानंतर ६ वर्षांनी १९९३मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या