जे जे रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी विनिता सिंघल नोडल ऑफिसर

790

जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे कोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे दिली.

जे जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात 300 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 60 खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात 250 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50 खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे यापैकी 100 खाटा आयसीयू साठी असतील अशी माहितीही अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या