‘जाने भी दो यारों’ येत्या शुक्रवारी

9

सामना ऑनलाईन । मुंबई

लेखक-दिग्दर्शक ओम कटारे यांचे ‘जाने भी दो यारों’ हे हिंदी नाटक जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये येत्या शुक्रवारी १२ जानेवारीला रात्री ९ वाजता रंगणार आहे. रोमँटिक, संवेदनशील आणि थोडेसे बोल्ड असे हे नाटक १८ वर्षांवरील लोकांसाठी आहे. दोन जीव… एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेत सूर्यास्ताचा आस्वाद घेत समुद्रकिनाऱ्यावर बसून संध्याकाळ घालवायची… प्रत्येक तरुणाचं हे स्वप्न.. असंच स्वप्न एखाद्या पतीदेवाचेही असू शकते ना.. लग्नाआधी चॉकलेट्स, फुलं, सिनेमा बघणं, डिनरला जाणं… अशा मैत्रिणीच्या मागण्या… पण नंतर काय घडतं? तिच्या मागण्या बदलतात… तिच्या मागण्या, तिची यादी वाढतच जाते. मग काय होतं? ते या विनोदी वळणाच्या नाटकातून पाहायला मिळेल. यात स्वतः ओम कटारे प्रमुख भूमिकेत असून सोबत प्रतीक पेंढारकर, राधा भारद्वाज, सोनम सिंह आणि लक्ष्य शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या