पुरुषांच्या सामन्यात महिला निभावणार पंचाची भुमिका

604

पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात लवकरच एक महिला पंचाची भुमिका निभावताना दिसणार आहे. जॅकेलिन विलियम्स असे त्या महिला पंचाचे नाव असून ती मूळची वेस्ट इंडिजची आहे. जॅकेलिन ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाची भूमिका निभावणारी पहिली महिला ठरणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड मध्ये होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांमध्ये जॅकलिन थर्ज अंपायर म्हणून काम पाहणार आहे. ‘मला दिलेली ही संधी फार मोठी असून मी त्यासाठी आयसीसी व वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे मी आभार मानते. मी याआधीही पुरुषांच्या सामन्यात पंचाचे काम केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मी पुरषांच्या सामन्यात पंचाचे काम करणार आहे. माझ्यासाछी ही फार अभिमानाची गोष्ट आहे.’, असे जॅकेलिन सांगते.

याआधी जॅकेलिन यांनी 2016 मध्ये देखील पुरुषांच्या सामन्यात पंचाची भूमिका निभावली होती. त्यांनी ओमान विरुद्ध नायजेरिया यांच्या मधील पाच सामन्यांच्या मालिकेत पंचाचे काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या