जॅकलीन मराठी चित्रपटाच्या प्रेमात!

918

व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. जवळपास 20 वर्षांनंतर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत उतरणारा हा पहिला हिंदुस्थानी चित्रपट ठरला आहे. या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावरून चैतन्यचे भरभरून कौतुक केले आहे. व्हेनिस महोत्सवात या चित्रपटाची निवड झाल्यानंतर बॉलीवूडमधून कौतुकाचा वर्षाव करणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. जॅकलीन ही बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असून सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्याकडून मिळालेला हा पाठिंबा नक्कीच या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष वेधणारा ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या