जॅकलिनचा वाढदिवस; गाणे ऐकणाऱयाला आयफोन, सुकेश चंद्रशेखरची घोषणा

दिल्लीच्या जेलमध्ये बंद असलेला आणि 200 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने एक घोषणा केली. जॅकलिन फर्नांडिस हिच्या वाढदिवसानिमित्त यिम्मी यिम्मी हे नवीन गाणे ऐकणाऱयाला थेट आयफोन 15 प्रो बक्षीस म्हणून दिला जाईल, असे म्हटले आहे. सुकेशने जेलमधून एक पत्र लिहिले असून या पत्रातून त्याने ही घोषणा केली. जास्तीत जास्त गाणे ऐकणाऱया 100 लोकांना आयफोन 15 प्रो भेट दिला जाईल.