Jade mine म्यानमारमध्ये जेडच्या खाणीत दरड कोसळली, 50 जणांचा मृत्यू

म्यानमारच्या उत्तरेकडच्या भागात असलेल्या एका जेडच्या खाणीमध्ये दरड कोसळून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली किमान 200 जण दबल्याची भीती वर्तवण्यात येत असून त्यांच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

म्यानमारमध्ये सध्या तुफान पाऊस पडतोय. जेड खोदण्याचं काम सुरू असताना ‘पावसामुळे चिखलाची मोठी लाट आली’ असं तिथल्या अग्निशमन दलाने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कचिन राज्यातील पाकांत भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या