जागरण महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका

768

दहाव्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा देखील मराठी सिनेमांची जादू प्रेक्षकांना अनुभवता आली. 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात पिकासो, झॉलीवूड, मर्दानी मावळा आणि इमॅगो हे दर्जेदार मराठी सिनेमांनी प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली.

जागरण महोत्सवात 28 सप्टेंबरला पिकासो या सिनेमाचे स्क्रिनिंग पार पडले. प्रसाद ओक याची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात पहिल्यांदाच दशावतार या लोककलेची कथा आणि व्यथा मांडली आहे. तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास आणि त्याविषयीचे दस्तावेज उपलब्ध आहेत. या लोककलेवर बेतलेला हा एकमेव चित्रपट असून याचे दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय वैदर्भीय लोककला झाडीपट्टीवर आधारित झॉलीवूड, मर्दानी मावळा, इमॅगो हे चित्रपट देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या