सरदार पटेलांना मंत्रिमंडळात घेण्याची नेहरूंची इच्छा नव्हती! परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे टिवटिव

618
jayshankar

सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्या मंत्रिमंडळात घेण्याची पंडित नेहरू यांची इच्छाच नव्हती. मंत्रिमंडळाच्या यादीतून नेहरूंनी पटेलांचे नावही वगळले होते असे ट्विट करून केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नवा वाद निर्माण केला आहे. जयशंकर यांच्या ट्विटला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तत्काळ उत्तर देत यासंदर्भात लॉर्ड माऊंटबॅटन यांना नेहरूंनी लिहिलेले पत्रच पुराव्यादाखल दिले आहे. या पत्रात मंत्रिमंडळाच्या यादीत पहिलेच नाव सरदार पटेलांचे आहे.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नारायणी बसू यांनी लिहिलेल्या ‘व्ही. पी. मेनन’ या पुस्तकाचा आधार घेऊन सरदार पटेल व पंडित नेहरू यांच्यात वाद असल्याचा जुना मुद्दा उकरून काढला. पंडित नेहरूना पटेलांना आपल्या मंत्रिमंडळात घ्यायचे नव्हते. त्यांनी यादीतूनही पटेल यांचे नाव वगळले होते अशा आशयाचे ट्विट करून वादाचा धुरळा उडवून दिला. राजकारणाचा इतिहास लिहिणारा प्रामाणिकच असला पाहिजे. सरदार पटेल यांचे निधन होताच त्यांच्या स्मृती पुसण्याची मोहीम राबवण्यात आली असे व्ही. पी. मेनन यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. याचाच आधार घेऊन जयशंकर यांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

जयशंकर यांच्या ट्विटवर काँग्रेसचा सवाल
केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या ट्विटवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अनेक ट्विट करून जयशंकर यांच्यावर पलटवार केला. 14 ऑगस्ट 1947 रोजी नेहरूंनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना लिहिलेले पत्रच रमेश यांनी ट्विट केले आहे. या पत्रात नेहरूनंतर पटेलांचे नाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या