बारवे गावच्या सरपंचपदी जाहिदा शिराजद्दीन देसाई यांची एक मताने निवड

सामना प्रतिनिधी । गारगोटी

बारवे (ता.भुदरगड) या गावच्या सरपंचपदी सौ. जाहिदा शिराजद्दीन देसाई यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. या ग्राम पंचायतीवर स्थानिक ज्योतिर्लिंग विकास आघाडीची सत्ता असून सरपंचपद रोटेशन पद्धतीने भूषवण्याचे असल्याने मावळते सरपंच जयश्री सुनिल चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ही  निवड करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी ए. आर. कोळी यांनी काम पाहिले. या वेळी  उपसरपंच जोतिराम शिंदे,  ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य आर. बी. पाटील व सदस्य मंगल राणे, सुवर्णा पाटील, सुनीता किरोळकर आप्पासाहेब सुतार गा. का.पाटील प्रकाश पाटील इतर मान्यवर उपस्थित होते. जाहिदा देसाई ह्या मा.आमदार बजरंग देसाई यांचे कट्टर समर्थक व भुदरगड तालुका संघाचे संचालक शिराजद्दीन देसाई, यांच्या पत्नी होत.निवडी नंतर मावळत्या सरपंचांचा गौरव व नूतन सरपंचाचे स्वागत करण्यात आले.