‘खंडेराय’ अवतरणार हिंदीत

106

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले मल्हारी मार्तंड अर्थात खंडेरायांवर आधारित जय मल्हार ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. आता ही मालिका हिंदीतही येणार असून हिंदी भाषेत डब करून दाखवण्यात येणार आहे. लवकरच झी हिंदी चॅनेलवर त्याचं प्रसारण होणार असल्याचं कळतं. या निमित्तानं हिंदीत डब होणारी ही पहिलीच पौराणिक मराठी मालिका ठरणार आहे. यापूर्वी ‘जय मल्हार’च्या तामिळ भाषेतल्या व्हर्जनलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या भूमिकांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स नेमण्यात आले असल्याची माहिती आहे.

याआधीही झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका हिंदीत ‘मोहे पिया मिलेंगे’ नावानं तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ही ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या नावानं हिंदीत डब करण्यात आली होती. या मालिका ओझी अॅपवर बघायला मिळतात. त्याबरोबरच ‘होणार सून मी ह्या घरची’ या तुफान लोकप्रिय ठरलेल्या मराठी मालिकेवर आधारित ‘सतरंगी ससुराल’ या नावाची हिंदी मालिका तयार करण्यात आली होती. त्याउलट पौराणिक जॉनरमधली ‘देवोंके देव महादेव’, ‘महाभारत’ यांसारख्या मूळ हिंदी मालिका इतर प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या