कश्मीरबाबत पाकड्यांच्या चर्चेत हिंदुस्थानी हॅकर घुसले, जय श्रीराम! चा केला जयघोष

जम्मू कश्मीर प्रश्नी पाकिस्तान नेहमीच आपले नाक खुपसत आहे, या भागावर पाकिस्तानने नेहमीच आपला दावा केला आहे, पण हिंदुस्थानने त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुस्थानी हॅकर्सने पाकिस्तानचे एक सेमिनार हॅक करून जय श्रीराम चे नारे दिले आहेत. या सेमिनारमध्ये जम्मू कश्मीर प्रश्नावर चर्चा सुरू होती.

जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर काही पाकिस्तानी अधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू होती. या सेमिनारदरम्यान भगवान रामाची गाणी ऐकू येत होती. सेमिनारमधील सदस्यांना वाटले की सेमिनारचे अयोजक डॉ. वलीद मलिक यांच्याकडून हे गाणे सुरू आहे, म्हणून त्यांना गाणी बंद करायला सांगितली.

त्यानंतरही मध्ये मध्ये ‘आम्ही हिंदुस्थानी आहोत, तुम्ही रडतच रहा, जय श्रीराम’ असे नारे ऐकू येऊ लागले. नंतर या सेमिनारची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यापूर्वी हिंदुस्थानी हॅकर्सनी पाकिस्तानच्या विद्यापीठांच्या वेबसाईट हॅक केली होती.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान कश्मीरचा मुद्दा फार जुना आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने आक्रमक होत नवीन नकाशे जारी केले होते. त्यात हिंदुस्थानचा भाग आपला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तसेच गिलगिट-बाल्टिस्तान या पाकव्याप्त कश्मीरला प्रांताचा दर्जाही त्यांनी दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या