तुरुंगात ‘हे’ काम करणार राम रहिम, दिवसाला ‘एवढे’ पैसे मिळणार

22

सामना ऑनलाईन । पंचकुला

न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनवल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमलची रवानगी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात करण्यात आली आहे. एकेकाळी कोट्यवधींची मालमत्ता असणारा, ७०० एकरमध्ये पसरलेला डेरा सच्चा सौदाचा पसारा आणि दीडशेपेक्षा जास्त हायफाय गाड्या वापरणार बाबा राम रहिम सध्या तुरुंगामध्ये ८ बाय ८ च्या खोलीमध्ये बंद आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगात राम रहिमला माळ्याचे काम देण्यात आले असून त्याला त्या कामाचे दिवसाला ४० रुपये दिले जाणार आहेत.

राजेशाही जीवनाचा भोक्ता असलेला राम रहिमला तुरुंगामध्ये इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. तुरुंगामध्ये बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राम रहिमला भेटण्याची बंदी घालण्यात आली आहे. मात्र तुरुंगातही बाबा राम रहिम फक्त मिनरल वॉटर (प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी) खरेदी करत असल्याची माहिती मिळत आहे.

सीबीआयच्या पंचकुला येथील विशेष न्यायालयाने २५ ऑगस्टला बाबा राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर २८ ऑगस्टला न्यायालयाने राम रहिमला २० वर्षांची (दोन बलात्कार प्रकरणी प्रत्येकी १० वर्ष) शिक्षा आणि ३० लाखांचा दंड सुनावला होता.

आपली प्रतिक्रिया द्या