काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांविरुद्ध विशेषाधिकार ठराव मांडण्यासाठी चार नोटिसा दिल्या आहेत. यातील दोन मोदी यांच्याविषयी असून, बघू यावर काय होते ते, असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.
संसदेचे अधिवेशन आज संस्थगित झाल्यावर रमेश यांनी एक्सवरून ही माहिती देताना, 82 वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी आजच्याच दिवशी देशाला ‘करो या मरो’चे आवाहन केले होते, याचीही आठवण सांगितली. माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याविरोधात मोदींनी लोकसभेत केलेल्या खोडसाळ टिप्पणीबद्दल मी नोटिसा दिल्या आहेत.