भोकरदन – जालना रस्त्यावरील भरधाव ट्रक अपघात, एक ठार तर दोन जखमी

जालना जिल्ह्यातील भोकरदन- जालना रस्त्यावरील वरील बामखेडा पाटी जवळील झालेल्या अपघातामध्ये किन्नर जागीच ठार झाला आहे तर चालक व दुसरा किन्नर जखमी झाल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भरधाव ट्रक क्र. (एमएच- 18-एए-9296) जालनाहून भोकरदनकडे येत असताना रस्त्यावरील असलेल्या खड्डया जवळून ट्रक चालकाने हलगर्जीपणामुळे ट्रक भरधाव वेगात नेल्यामुळे पुलाजवळ ट्रक आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये मनीष दिनेश बडोले (25) रा. हरणगाव तालुका अंजेड,जिल्हा बडवानी (एम.पी.) ठार झाला आहे. तर ट्रक चालक महेश गंगाराम बडोले (35)रा. जलवानिया ता. अंजेड जिल्हा बडवानी, किन्नर निशिल नयन सोळंकी (17) रा. बालसमध तालुका राजपूर जिल्हा बडवानी (म. प.) पायाला,कंबर मार लागल्याने जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. पुढील तपास पोलिस जमादार मिलिंद सुरडकर हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या