जालना जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी

463

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील एका 65 वर्षीय वृध्द महिलेचा जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज 6 जून शनिवारी सकाळी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधूकर राठोड यांनी ‘सामना’शी बोलतांना दिली. हा जालना जिल्ह्यातील चौथा बळी ठरला आहे.

जालना जिल्ह्यातील मूळची घनसावंगी तालुक्यातील रांजनी जवळील पांगरा येथील रहिवासी असलेली ही महिला काही दिवसांपूर्वी मुंबई येथून जालन्यात परतली होती. तिची प्रकृती बिघडल्याने सदर महिला तीन दिवसापूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. दमा, रक्तदाबाचा आजार असलेली ही महिला कोरोना बाधित असल्याचे प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र प्रकृती अधिक चिंताजनक होऊन सदर महिलेचा आज 6 जून शनिवारी सकाळी मृत्यू झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाचा चौथा बळी गेला असून जिल्ह्यची चिंता वाढत चालली आहे. जनतेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या