दैनिकाचे कार्यालय फोडले; १५ हजारांचा ऐवज चोरी

28

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहरातील मोदीखान्यातील “कृष्णनीती” दैनिकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून १५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवार, २१ मार्च रोजी पहाटे २ ते ११ वाजेच्या दरम्यान घडली.

मोदीखान्यातील “कृष्णनीती” कार्यालयात वृत्तसंकलनाचे काम व पेपर छपाई झाल्यानंतर पहाटे २ च्या सुमारास बंद करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी बंद कार्यालयाचे समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. केबिनमधील लॉर्कर तोडून त्यातील नगदी व चांदीचे शिक्के असा १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच सीसीटीव्ही कॅमेराची डीव्हीआर मशीन, इनसर्ट इंडिया पाली (जि.बीड) या संस्थेची एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी ठेवलेली दानपेटीही चोरून नेली.

चोरीची घटना सकाळी ११ वाजता निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, शिवाजी जमधडे, रवीद्र देशमुख,संदीप बोदरे, कृष्णा तंगे आदींनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या