कोरोनाच्या धास्तीने फुलांचे पीक बांधावर फेकले

740

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहीपुरी-दुधपुरी फाट्यावर केशव बाळाभाऊ लाघडे या शेतकर्‍याची अडीच एकर जमीन आहे. ओल्या दुष्काळामुळे उध्वस्त झालेली कपाशी उपटून फेकली व त्यावर मार्च , एप्रिलमध्ये बाजारात येईल या अंदाजाने डिसेंबरमध्ये बिजली व गलांडा फुलांची दोन एकरमध्ये लागवड केली. त्यास वेळोवेळी खतांच्या मात्रा, औषध फवारणी केली व ठिबकद्वारे पाणी चालू होते.

विकत आणलेल्या रोपांसह खुरपन, खते, फवारणी अंदाजे ३५ हजाराच्या पुढे खर्च झाला. परंतु कोरोना संसर्गाच्या संचारबंदी मुळे फुलांसह सर्वच मार्केट बंद असल्यामुळे हजारो रूपयांचा उत्पादन खर्च करून सुध्दा हातातोंडाला आलेले फुलांचे बहरलेले पीक नाईलास्तव बांधावर उपटून फेकावे लागले.

गेल्या दोन-तीन वर्षापासून विहीरी,बोअर,तलावाला दुष्काळामुळे पाणी नव्हते. यावर्षी उन्हाळ्यात पीके घेत आहोत तर ,जर लवकरच कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरला नाहीतर फळबागांसह उन्हाळी भाजीपाला, फुलांचे पिके घेणाऱ्या शेतकर्‍यांना खुप मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे शेतकरी केशव लाघडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या