जालना जिल्ह्यात `माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियाना अंतर्गत 10 लाख नागरिकांचे सर्वेक्षण पुर्ण

कोवीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत असून जालना जिल्ह्यातही हे अभियान गतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 10 लाख 24 हजार 264 लोकांचे सर्वेक्षण केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

जालना तालुक्यामध्ये 146 गावात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र 31 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 203 आशा कर्मचाऱ्यांनी 2 लाख 27 हजार 729 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. जालना ग्रामीण गावांमध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 90 आशा कर्मचाऱ्यांनी 1 लाख 16 हजार 439 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. मंठा तालुक्यात 113 गावात 3 प्राथमिक आरोग्य केंद्र 24 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 155 आशा कर्मचाऱ्यांनी 95 हजार 864 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. परतुर तालुक्यात 96 गावात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 19 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 135 आशा कर्मचाऱ्यांनी 27 हजार 797 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. घनसावंगी तालुक्यात 117 गावात 5 प्राथमिक आरोग्य केंद्र 27 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 104 आशा कर्मचाऱ्यांनी 1 लाख 31 हजार 179 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. अंबड तालुक्यातील 136 गावात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र 34 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 214 आशा कर्मचाऱ्यांनी 1 लाख 52 हजार 949 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. बदनापुर तालुक्यातील 106 गावात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 22 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 152 आशा कर्मचाऱ्यांनी 1 लाख 17 हजार 226लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. जाफराबाद तालुक्यातील 101 गावात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 21 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 159 आशा कर्मचाऱ्यांनी 43 हजार 594 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. भोकरदन तालुक्यातील 159 गावात 8 प्राथमिक आरोग्य केंद्र 40 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 264 आशा कर्मचाऱ्यानी 1 लाख 16 हजार 487 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. अशा प्रकारे संपुर्ण जिल्ह्यातील 974 गावात 43प्राथमिक आरोग्य केंद्र 218 उपकेंद्र यांच्या माध्यामातुन 1 हजार 556 आशा कर्मचाऱ्यांनी 10 लाख 24 हजार 264 लोकांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या