जालन्याचा तरुण संभाजीनगरात कोरोना पॉझिटीव्ह, नातेवाईकांना केले क्वारंटाईन

828

संभाजीनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका तरुणाच्या जालना येथील ७ ते ८ नातेवाईकांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंठा चौफुली परिसरातील साईनगर, शाकुंतलनगर हा परिसर जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे सील केला आहे. जालना येथील मंठा चौफुली परिसरातील एक तरुण संभाजीनगर येथील एका हॉस्पीटलमध्ये ब्रदर म्हणून कामास आहे. तो सर्व कुटुंबीयांसह संभाजीनगर येथेच राहत होता. मात्र, संभाजीनगर येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने त्याचे सर्व कुटूंब ४-५ दिवसांपूर्वी जालन्यात साईनगर येथे शिफ्ट झाले होते. तो कुटूंबीयांना सोडून परत संभाजीनगर येथे गेला होता. दरम्यान, तो संभाजीनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल आहे. जालना प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व कुटूंबाला जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगर प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या