जालन्यात परतीच्या पावसाने पारधला झोडपले, कपाशीच्या वाती झाल्या

भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात आज 17 सप्टेंबर रोजी दुपार परतीच्या पावसाने झोडपून काढले आसून मका व सोयाबीन पुर्ण पणे भिजले तर वेचनीला आलेला कपाशीचा कापुसाच्या वाती लोंबल्याने शेतकऱ्यांसमोर अर्थिक संकट आले आहे.

दोन वर्षापासून पडणारा दुष्काळ सहा महीन्या पासून सुरू असलेले कोरोनाची महामारी यात शेतकऱ्याने कसाबसा तग धरून शेतात पेरणी केली होते नव्हते शेतीत टाकले. परंतु पावसाने काही पिच्छा सोडला नाही. मिरची,उडीद व पुर्ण नष्ट झाले. शासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले परंतु अद्यापही या पिकाचे नुकसान भरपाई जाहीर झाली नाही. अशातच परतीच्या पावसाने सुरवात केल्याने सोयाबीन व मका सोंगण्यास सुरवात केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन व मका सोगणी करून ठेवली. हे पिके जमा करण्याच्या तयारीत असताना आज दुपारी दोन वाजेनंतर परतीच्या पावसाने पारधसह परिसराला झोडपून काढले. दुपारी आलेल्या जोरदार पावसाने सोगून ठेवलेली मका व सोयाबीन पुर्णपणे भिजले असून वेचणीला आलेल्या कपाशीच्या वाती लोबल्या आहे. परतीच्या पावसाने आधीच डबघाईत आलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या