
जालनाजवळील जामवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. दररोज समृद्धी महामार्गावर अपघाताच्या बातम्या येत आहेत. शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास एका कंटनेरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो कंटेनर पुलावर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. कंटेनर मधील चालक आणि क्लिनर दोघेही सुखरूप आहेत.
सदरील कंटेनर पुण्याहून जमशेदपूरकडे जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटून जालना ते देऊळगाव राजा मार्गावर पुलावर गाडी धडकली. त्यानंतर कंटनेरचा टायर फुटून पलटी झाल्याचे महामार्ग पोलिसांनी दिली. कंटेनर चालक राहुल तेजराव हिवाळे (25) आणि क्लिनर पुष्पेन्द्र यादव दोघेही सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच जालना महामार्ग पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. महामार्ग केंद्राचे पीएसआय जाधव, हेडकॉन्स्टेबल बोरसे, मुंडे, चालक केदारे इत्यादींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.