जालन्यात  लग्नासाठी जाणाऱ्य़ा गाडीचा भीषण अपघात, सात जण जखमी

जालना जिल्ह्यात लग्नाला जाणार्‍या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघात सात जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील झिरपी येथील महादेव मंदिर शेजारी जालना-वडीगोद्री हायवेवर आज सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास गाडीचा अपघात झाला होता. गाडीत सर्व वर्‍हाडी मंडळी होती आणि ते लग्नासाठी निघाले होते. चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने हा अपघात झाला. वाहन दोन वेळा उलटून शेतात खाली गेल्याने प्रवाशांना अक्षरशः गाडीतून ओढून बाहेर काढावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेले महेंद्र  गायकवाड, ताहेर बागवान,शरद मुळे यांनी सांगितले.  सर्व जखमींना अंबड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या