उसाच्या ट्रकखाली दबून दोन चिमुकल्यांचा अंत

30
सामना ऑनलाईन । जालना
ऊस नेणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील बुद्रूक गावामध्ये घडली आहे.
गोंदी येथून (एम एच २१ जे ८६) हा ट्रक गोंदीवरून समर्थ सहकारी साखर कारखान्यावर ऊस घेऊन जात होता.  पाथरवाला बुद्रुक येथे सार्थक राजेंद्र थेटे (५),ओंकार कृष्णा चोरमारे (६) हे दोन्ही मुले घराजवळ खेळत असताना या ट्रक चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले. त्यामध्ये ट्रक पलटी झाला.
गावकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने ऊस हटवून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या