माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

686

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे (67) यांचे आज 16 जुन रोजी दुपारी दीड वाजता निधन झाले. कोरोनाची बाधा झाल्यामुळे जावळे यांच्यावर मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची मागिल काही दिवसापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. जावळे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यावर त्यांच्यावर जळगावला प्रथमोपचार करून उपचारासाठी मुंबईत बॉम्बे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना आज दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले. जावळे हे भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2007 च्या पोटनिवडणुकीत व 2009 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीत जावळे हे रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. यापूर्वीही यावल विधानसभा मतदारसंघातून एकवेळ आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या