जळगाव जिल्ह्यात 24 रुग्ण वाढले; 13 जणांचा मृत्यू

899

जळगाव जिल्ह्यामध्ये मागील 36 तासात 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असुन 1 जून रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार 24 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 762 वर पोहचली असून त्यापैकी 316 जण बरे झाले आहेत. तर 94 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये 352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकडुन पाठविण्यात आलेल्या 120 व्यक्तींच्या घशातील लाळेचा नमुना तपासणी अहवाल 1 जून रोजी रात्री प्राप्त झाला. या 120 पैकी 96 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 24 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 5, जळगाव तालुक्यातील 5, भुसावळ मधील 4, भडगाव मधील 5, यावल, जामनेर, अमळनेर मधील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागिल ३६ तासामध्ये जळगाव जिल्ह्यात 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजवर 94 कोरोनाग्रस्त रुग्णांना जीव गमवावा लागला असून भुसावळ तालुक्यातील 27 जणांचा तर अमळनेरमधील 16 जणांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. 1 जूनच्या रात्रीपर्यंत एकुण 762 कोरोबाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या