जळगाव जिल्ह्याला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

865

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास महिला व बाल विकासमंत्री देवोश्री चौधरी, रवींद्र पनवर, अपर सचिव के. मोझेस चलाई तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानात जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या जिल्ह्याचे स्त्राी-पुरुष प्रमाण 841 वरून 925 पर्यंत पोहचले आहे. यापूर्वीही या जिल्ह्यास या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या