महाजन यांच्या गैरव्यवहारासंदर्भातील सीडी- पेनड्राइव्ह माझ्याकडे, माजी नगराध्यक्ष ललवाणी यांचा आरोप

भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड यांच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्थांच्या जमिनी लाटल्याचा खळबळजनक आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत केला.

जळगाव जिह्यातील जामनेर येथील ललवाणी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. यावेळी माहिती देतांना ललवाणी म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या गैरव्यवहारासंदर्भातील सीडी आणि पेन ड्राइव्ह माझ्याकडेही असून त्याला योग्यवेळी उघड करणार आहे. तसेच जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमदार महाजन यांनी माझ्यावर नगरपालिकेत 10 लाखांच्या पाइपाच्या अपहाराचा खोटा गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाने सांगितले की, यात मुख्याधिकाऱयांचे नाव नसल्याने आम्हाला जामीन मिळाला. पीआय शेख यांनी आम्हाला अनेक वेळा धमक्या दिल्या. ललवाणींनी त्यांच्या जवळील 1 सीडी, पेन ड्राइव्ह दाखवला. मात्र त्यात काय आहे याविषयी सांगितले नाही. ‘हा ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे’ असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या