समाजाच्या सेवेसाठीच शिवसेना काम करते – जालिंधर बुधवत

हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण अन् 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र आम्हाला शिकवला आहे. सत्तापदांपेक्षा समाजऋण फेडण्यासाठी, संकटकाळी धावून जाण्यासाठी शिवसेना कायम तत्पर आहे. कोरोनाच्या भयावह संकटातही शिवसैनिक मदतीला पुढे आले. समाजाच्या सेवेसाठीच शिवसेना काम करत असून सेवेचा हा महायज्ञकुंड कायम प्रज्वलीत राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या पुढाकारातून करण्यात आले. मनोरुग्णांना आसरा देत त्यांचा सांभाळ करणार्‍या सेवा संकल्प आश्रम पळसखेड सपकाळ येथील संस्थेच्या परिसरात वस्त्रदान, अनदानाचे वाटप जालिंधर बुधवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सेवासंकल्पाचे नंदुभाऊ पालवे व आरती पालवे यांचा सत्कार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. याप्रंसगी तालुका प्रमुख लखन गाडेकर, शिक्षक सेना पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रमोद पवार, अशोकमामा गव्हाणे, माणिकराव सावळे, सुमंता इंगळे, शेषराव जगताप, सुरेश जगताप, संजय धंदर, शिवानंद सावळे, निकेतन सोळंके, प्रफुल जायभाये, गिरीष आडेकर, विजय हुंडीवाले, दिलीप गोरे, आकाश पाखरे, विकास भवर, विशाल उबरहंडे, अक्षय बेलोकर, दिवाकर दराडे, सुधाकर मुंढे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या