कुसुमाग्रज स्मारकात 29 जानेवारी रोजी दाखवणार ‘जल्लीकट्टू’ चित्रपट

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी नाशिक यांच्या विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 06.00 वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक येथे ‘जल्लीकट्टू’ हा मल्याळम चित्रपट दाखवला जाणार आहे.

नोव्हेंबर 2019 च्या इफ्फी गोवा मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात दोन तीन सिंनेमांची खूप चर्चा होती. यात मराठीतील माई घाट केस क्र…, हेल्लारो हा गुजराती आणि मल्याळम भाषेतील जल्लीकट्टू या सिनेमांची तर प्रचंड चर्चा होती. तिन्ही सिनेमे स्पर्धेत असल्याने खूप उत्सुकता होतीच आणि यामध्ये जल्लीकट्टूने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला होता. विशेष म्हणजे लॉस एंजेलीस येथे होणार्‍या 93 व्या अकादमी म्हणजेच ऑस्कर पुरस्कारासाठी जल्लीकट्टू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शुक्रवार दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 06.00 वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे होणार्‍या या चित्रपटाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान व फाळके फिल्म सोसायटीने केले आहे.

चित्रपटस्थळी मुखपट्टी (Mask) सक्तीची आहे. संस्थेमार्फत सॅनिटायजर तसेच दोन खूर्च्यामध्ये अंतर अशी व्यवस्था केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या