वरळीत ‘जल्लोष महिला दिना’चा

सामना ऑनलाईन, मुंबई

आपल्या कामात गढून गेलेल्या महिलांना आनंदाचे दोन क्षण अनुभवता यावेत म्हणून शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आयोजित केलेल्या वरळीतील ‘जल्लोष महिला दिना’चा या भव्यदिव्य कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत एकच जल्लोष केला. या कार्यक्रमात मराठमोळी गाणी, हास्य फवारे आणि ठसकेबाज लावणीवर ठेका धरत महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी २५ भाग्यवान महिलांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नाशिकचे आमदार अनिल कदम, विभागप्रमुख नगरसेवक आशीष चेंबूरकर, विभाग संघटक नगरसेविका किशोरी पेडणेकर, उपविभागप्रमुख राम साळगावकर, अनुपमा परब, सुलेखा मेढेकर, संदीप वरखडे, नगरसेवक संतोष खरात, दीपा मंत्री, संपदा सुनील शिंदे, बाळा खोपडे, नंदू गावडे, माजी नगरसेवक ऍड. जगदीश सावंत आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या