जालना- कोरोनाबाधित रुग्णाची लग्नाला हजेरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

733
प्रातिनिधिक फोटो

जालना शहरातील साईनगर येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. तरी देखील त्याने क्वारंटाईन न होता उलट एका नातेवाईकांच्या लग्नात हजेरी लावली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना जालना भागातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमधील काही जणांचे अहवाल 21 मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. हा इसम त्या हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. 27 मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तसेच अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर 29 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना असताना देखील तो जाणूनबुजून एका लग्नाला उपस्थित राहिला. म्हणून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या