जालना – तीन महिन्याच्या बाळाचा टाकीत बुडवून खून

313

जालना जिल्ह्यातील अंबड येथे तिन महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह घरासमोर असलेल्या एका 100 लिटरच्या पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने अंबड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना अंबड शहरातील आंबेडकरनगर येथे सोमवारी घडली आहे. पायल विजय जाधव हीने तिचा तिन महिन्याच्या मुलास रात्री एक वाजता दुध पाजून घरातील पलंगाला असलेल्या झोळीत झोपी घातले होते. यानंतर ती तिचा पती विजय जाधव असे घराबाहेर झोपले होते. त्यानंतर कोणीतरी अज्ञात आरोपीने झोळीतील चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत टाकुन खुन केला असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलाची आई पायल विजय जाधव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या