दुकानातील फेअर अँड लव्हली आणि संतूर साबण चोरले; सव्वा लाखांचा मुद्देमाल गायब

497

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी इथे चोरांनी फेअर अँड लव्हली आणि संतूर साबणाचीही चोरी केली आहे. शहागड मार्गावर साडेगाव येथील बद्रीनाथ धोंडरे यांचे ओमकार प्रोव्हीजन नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये दोन दिवसांपूर्वी चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे वरचे पत्रे उचकटले आणि आतमध्ये प्रवेश केला.

पोलिसांना चोरीबाबात कळवण्यात आलं तेव्हा त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नुकसान किती झालं याचा अंदाजही घेतला. दुकानातून सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये 50 हजार रुपयांच्या रोख रकमेचाही समावेश आहे. चोराने दुकानातून संतूर साबणाच्या 5 पेट्या, फेअर अँड लव्हलीचे 144 ट्युब, फेअर अँड लव्हलीचेच पाऊच असलेल्या 2 पेट्या, गोडतेल (120 लिटर), चहाचे 2 खोके असा माल दुकानातून चोरीला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या