‘सामना ऑनलाईन’च्या बातमीचा दणका, अखेर ‘त्या’ 7 व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील तीर्थपूरीत सोशल डिस्टनसिंगचा फ़ज़्जा’ या मथळयाखाली ‘सामना ऑनलाईन’ला बातमी प्रसिद्ध होताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली होती. आज शुक्रवारी 22 मे रोजी  यासंदर्भात पोलिसांनी बेधड़क कारवाई करुन  व्यापाऱ्याना दणका दिला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क न लावणे, सोशल डिस्टनसिंग न पाळणे, सॅनिटायझर न वापरने आदि शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सुमित अग्रवाल, उद्धव गुळजे, अशोक राइन्द्रे, संतोष बोबडे, विष्णु रोडे, पांडुरंग उढाण, मयूर मोरे या 7 व्यापाऱ्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्या तक्रारीवरून भादवी कलम 188, 269, 270, 34, 51 व भारतीय व्यवस्थापन कायद्याप्रमाने गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कंटुले हे करत आहेत.

screenshot_2020-05-22-22-08-41-262_com-google-android-gm

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात शासनाने जालना जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट केल्याने पुढील नऊ दिवस सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरुवारी जारी केले. मात्र शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी आजूबाजूच्या खेड्यातील शेकडो नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग पायदळी तुडवत एकच गर्दी केली होती.

जालना जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा… बँकेत तोबा गर्दी, अनेक दुकाने सुरू

आपली प्रतिक्रिया द्या