जालना – 7 कोरोना संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल

1324
फोटो- प्रातिनिधीक

जालना जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी 7 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील 3 जण नेपाळ, 1 महिला अमेरिकेतून आलेली असून उर्वरित तिघे भोकरदन तालुक्यातील एका गावातील आहेत.

गुरुवारी दाखल झालेल्या 7 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले. तर यातील एक व शुक्रवारी दाखल झालेले 7 अशा 8 रुग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत एकूण 73 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले होते. त्यापैकी 71 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यातील 65 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, सध्या 7 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या