कर्नाटकातील गुटखा जालन्यात पकडला, साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; गोंदी पोलिसांची कारवाई

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड -पैठण फाट्यावर शुक्रवारी मध्यरात्री कर्नाटक राज्यातुन संभाजीनगरकडे जाणारी गुटख्याची क्रूझर गाडी गोंदी पोलिसांनी पकडली. दीड लाखाचा गुटखा आणि पाच लाख रुपये किंमतीची क्रूझर जीप असा साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

कर्नाटक राज्यातून क्रुझरगाडीतुन संभाजीनगरकडे गुटखा घेऊन क्रूझर जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. शहागड येथे असलेल्या पैठण फाट्यावर सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी रात्री सापळा रचुन क्रूझर अडवली.

झाडाझडती घेतली असता क्रूझरमध्ये दीड लाखाचा गुटखा विक्रीसाठी जात असल्याचे आढळून आल्याने गुटखासह पाच लाखाची जीप जप्त केली. असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक शरणअप्पा हरसुड (रा. गुलबर्गा) आणि क्लिनर मलिकार्जु मर्दे (रा. गुलबर्गा) यांना गोंदी पोलिसांनी अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या