मानवी आरोग्यास घातक अल्पाझोलम प्रतिबंधीत गुंगीकारक औषधे व टॅबलेट (बटन गोळ्या) विक्रीसाठी बाळगणार्या 4 आरोपींच्या ताब्यातुन 8 लाख 18 हजार 400 रुपये किंमतीच्या गोळ्यांचा अवैध साठा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. या गोळ्यांचा तरुणांमध्ये अधिक प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रभारी पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. 6 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपी अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख हा भोकरदन नाका परिसरात अल्पाझोलम हा प्रतिबंधीत घटक असलेल्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंच व अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह छापा कारवाई टाकला आणि अल्तमश शेख याच्या ताब्यातुन एर्दैर्दे-05.50 या कंपनीच्या गोळ्यांचे 7 हजार 120 रुपये किंमतीची पाकीटे जप्त करण्यात आले आहे. त्यास गोळ्यांचा पुरवठा करणारे संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड (विराज मेडीकल) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांना सदरच्या गोळया उध्दव शिवाजी पटारे रा.सोमनाथ जळगाव ता.जि. जालना ह.मु सनसिटी जालना हा पुरवठा करीत असल्याचे सांगितल्याने सदर इसमाचा शोध घेतला असता त्याला त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नमुद आरोपीतांचे ताब्यातुन 8 लाख 18 हजार 400 किंमतीच्या नशेच्या गर्भपाताच्या व उत्तेजक गोळ्यांचे पाकीटे अन्न औषध निरीक्षक वर्षा महाजन यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला आहे. आरोपी अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख ,संतोष बालासाहेब जाधव,राहुल भागाजी गायकवाड, उध्दव शिवाजी पटारे या इसमांविरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील दोषी असलेल्या मेडीकल व्यवसायिक यांच्या मेडीकल दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे,पोलीस अमंलदार रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, जगदीश बावणे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विजय डिक्कर, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, इरशाद पटेल, अक्रूर धांडगे, मपोना/चंद्रकला शडमल्लु, संदीप चिंचोले, किशोर पुंगळे, सचीन राऊत, योगेश सहाणे, सोपान क्षीरसागर, रमेश काळे व चालक गणपत पवार, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे